राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु आहे. कागलमधल्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु आहे. यानंतर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याला बदनाम करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे. असं हसन मुश्रीफ म्हणाले.
तसेच “ईडीच्या छाप्याचं कारण मला माहित नाही. पुण्यातील चंद्रकांत गायकवाड माझे मित्र आहेत. तसंच जावयावरील आरोप खोटे आहेत. परंतु त्यांच्याशी व्यायसायिक संबंध नाहीत. काही कारवाई करायची असेल तर समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं आहे,” यापूर्वी देखील माझ्या घरावर छापे पडले होते. त्यावेळी मी ईडीला पूर्ण माहिती दिली आहे. आज पुन्हा त्यांनी छापेमारी का केली हे आपल्याला माहित नाही. याशिवाय त्यांनी कोणत्या हेतून ही कारवाई हेही मला समजलेलं नाही. असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
आता माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणत आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीच्या लोकांच्या लोकांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी शंका निर्माण होत आहे, असे मुश्रीफ म्हणाले.