माहीम चर्च दफनभूमीत तोडफोड, दाऊद इब्राहिम अटकेत

मुंबईतील ख्रिस्ती समुदाय प्रचंड संतापलाय. माहीमच्या ख्रिस्ती दफनभूमीत झालेली तोडफोड ख्रिस्ती समाजाला आवडलेली नाही. शुक्रवारी सकाळी सेंट मायकल चर्चमधील सुमारे १८ कबरी उध्वस्त करण्यात आल्याचे उघड झाले. या तोडफोड प्रकरणी २२ वर्षीय मुसलमान तरुणाला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या मामाच्या निवासस्थानातून, नवी मुंबई इथून, शोधून काढले आहे. माहीम पोलिसांनी या अनुषंगाने सांगितले […]

माहीम चर्च दफनभूमीत तोडफोड, दाऊद इब्राहिम अटकेत

मुंबईतील ख्रिस्ती समुदाय प्रचंड संतापलाय. माहीमच्या ख्रिस्ती दफनभूमीत झालेली तोडफोड ख्रिस्ती समाजाला आवडलेली नाही.

शुक्रवारी सकाळी सेंट मायकल चर्चमधील सुमारे १८ कबरी उध्वस्त करण्यात आल्याचे उघड झाले. या तोडफोड प्रकरणी २२ वर्षीय मुसलमान तरुणाला माहीम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या मामाच्या निवासस्थानातून, नवी मुंबई इथून, शोधून काढले आहे. माहीम पोलिसांनी या अनुषंगाने सांगितले आहे की, वर्षभरापूर्वी आरोपीच्या आईचे निधन झाले आणि त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.

शनिवारी पहाटे माहीममधील सेंट मायकल चर्चला जोडून असलेल्या दफनभूमीत अठरा समाधीस्थळांची तोडफोड करण्यात आली. कॅथोलिक समुदाय यामुळे संतप्त झाला. वांद्रे पश्चिमेतील रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी सेंट पीटर्स चर्चच्या दफनभूमीचा एक भाग पाडण्यासाठी बीएमसीने नोटीस बजावली असताना ही घटना घडली. संपूर्ण घटना चर्चमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात फुटेजमध्ये तपासले असता एक तरुणाकडून ही तोडफोड झाल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे शोध घेत माहीम पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. दाऊद इब्राहिम मोहम्मद हारून कुरेशी असे आरोपीचे नाव असून तो कळंबोली येथील रहिवासी आहे. तो त्याच्या वडिलांसोबत गाद्या बनवण्याचे काम करतो. पोलिसांनी सांगितले की, दाऊदच्या आईच्या निधनानंतर त्याचा अल्लाहवरचा विश्वास उडाला. त्यातच, गेल्या चार-पाच दिवसांपासून दाऊद घरीही गेला नव्हता असेही पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number