‘मविआने निवडणूका एकत्र लढवाव्या’

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव गट या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नसल्याचे पवार म्हणाले. शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास […]

‘मविआने निवडणूका एकत्र लढवाव्या’

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव गट या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नसल्याचे पवार म्हणाले. शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. त्यामध्ये इतर गटांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सध्या सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आणि ती व्यवस्थित त्या ठिकाणी मांडावी यासाठी आमचे सर्वाचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी सुद्धा दोन ते तीनवेळा बैठक घेण्यात आल्या आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे. हे योग्य नसल्याचे पवारांनी यावेळी म्हंटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number