उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद सध्या चांगलाच रंगला आहे. हा राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच दोन दिवसात खुलासा करून दिला नाही तर कारवाई करण्यात येईल असेही रुपाली चाकणकर यांनी यांना बजावले आहे.
चाकणकर म्हणतात, ” कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली आहे, महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.”
रुपाली चाकणकर यांनी पाठवलेल्या नोटिसीबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट करून प्रतिकिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणतात,’ स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे.राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी होती. तर तिला न देता हा नंगानाच होऊ देणार नाही. अशी भूमिका घेणारीला पाठवली आहे. असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार.” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. त्यामुळे आता चाकणकर आणि वाघ हा वाद किती पेटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.