‘राम मंदिर १ जानेवारी २०२४ला तयार असेल’

उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्यामध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन १ जानेवारी २०२४ रोजी केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी याची घोषणा केली. विशेष म्हणजे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राम मंदिर उद्घाटनाची तारीख जाहीर करणे भाजपच्या व्होट पॉलिटिक्सशी जोडले जात आहे. अमित शहा यांनी राम मंदिर निर्माण आणि त्याच्या उद्घाटनाची […]

‘राम मंदिर १ जानेवारी २०२४ला तयार असेल’

उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्यामध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन १ जानेवारी २०२४ रोजी केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी याची घोषणा केली. विशेष म्हणजे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राम मंदिर उद्घाटनाची तारीख जाहीर करणे भाजपच्या व्होट पॉलिटिक्सशी जोडले जात आहे. अमित शहा यांनी राम मंदिर निर्माण आणि त्याच्या उद्घाटनाची घोषणा करताना अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. “काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राम मंदिर निर्मितीच्या कार्यात अडथळा आणला. याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता असताना आलाय”, असं अमित शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचे भूमि अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला होता. मंदिर निर्माणाचे भूमिपूजन होताच राम मंदिरासाठी भाजपचे आंदोलन फलद्रुप झाले होते. या आंदोलनाने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवले.

त्रिपुरा राज्यातील धर्मनगर येथे सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा म्हणाले की, काँग्रेस सरकार स्वातंत्र्यापासून राम मंदिराचा मुद्दा रखडवत आली आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला. मंदिराचं भूमिपूजन झालं आणि तातडीनं कामालाही सुरुवात झाली, असं अमित शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात पाकिस्तान भारतीय जवानांची शीर कापून नेत होती. मोदींनी पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवला. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून त्यांचे विशेष अधिकार संपवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number