मराठे भुजबळांवर भडकले

जाणता राजा कोण हा वाद राष्ट्रवादीच्या बाहेरही पेटलाय. यामुळे मराठा समन्वयक आमदार छगन भुजबळ यांच्यावर संतापले आहेत. छगन भुजबळ यांनी शरद पवार हे जाणता राजा असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावर आता मराठा नेते भडकले आहेत, इतिहासात फक्त एकाच जाणता राजा आहे असे त्यांनी भुजबळांना ठासून सांगितले आहे. मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी […]

मराठे भुजबळांवर भडकले

जाणता राजा कोण हा वाद राष्ट्रवादीच्या बाहेरही पेटलाय. यामुळे मराठा समन्वयक आमदार छगन भुजबळ यांच्यावर संतापले आहेत.

छगन भुजबळ यांनी शरद पवार हे जाणता राजा असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावर आता मराठा नेते भडकले आहेत, इतिहासात फक्त एकाच जाणता राजा आहे असे त्यांनी भुजबळांना ठासून सांगितले आहे.

मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, “शरद पवार यांना जाणता राजा म्हणणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितले आहे, भुजबळ यांनी लक्षात ठेवावे की, ते जामीनीवर सुटलेले आहेत. भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. तुम्ही लूट केली लुटारू म्हणून तुम्हाला तुरुंगात घातले होते. तुम्ही शरद पवारांना तुमच्या सारख्या लुटारू लोकांचा राजा म्हणू शकता. पण तुम्ही पवारांना जाणता राजा म्हणू शकत नाही जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत.” असेही दिलीप पाटील म्हणाले आहेत.

तर संभाजीराजे समर्थक आणि स्वराज्य पक्षाचे नेता धनंजय जाधव म्हणाले की, मुळात आपल्या प्रेमाखातर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासोबत तुलना करण्याचा प्रयत्न कुणाही नेत्याने करू नये. प्रत्येकाचं योगदान वेगळं असू शकतं. पण, कोणत्याही महापुरूषासोबत कुणाही नेत्याची तुलना होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. असेही धनंजय जाधव ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

इतिहास काय सांगतो?

समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘जाणता राजा’ म्हणाले. समर्थ रामदास स्वामी यांनी एका स्तुतीपर श्लोकात ‘जाणता राजा’ या शब्दाचा प्रयोग केला आणि शिवरायांचे गुणवर्णन केले. समर्थ रामदास म्हणतात,

यशवंत किर्तीवंत ।
सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत ।
जाणता राजा ॥

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number