उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद सध्या चांगलाच रंगला आहे. आणि हा वाद राज्याच्या महिला आयोगापर्यंत पोहोचला असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटर वरून एक व्हिडिओ ट्विट केले होते. त्यात म्हटले आहे की, भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीर प्रदर्शनाचे जे अतिशय बिभत्स आहे. राज्य महिला आयोग समर्थन करत आहे का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता.
त्यावर चित्रा वाघ यांच्या या प्रश्नावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना म्हंटलं आहे की, राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 10 हजार 907 तक्रारी आल्या. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यातून ही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेंव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.
चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, ” सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या नंगानाचवर कारवाई करायला महिला आयोगाला वेळ नाही उर्फीचा धर्म बघुन तिला माझा विरोध नाही. समाजस्वास्थ्य राखणे गरजेचे त्यात राजकारण नको महिला आयोग उर्फी जावेदला जाब का विचारत नाही. अशा अंग प्रदर्शनावर कारवाई करण्यात येत नसेन तर काय उपयोग? असा प्रश्न विचारात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवण्याचा अधिकार नाही.”असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….