मुख्यमंत्री हे वॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वॉईसरॉय ॲाफ महाराष्ट्र आहेत. वॉईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचेही ऐकायचा नाही तसे मुख्यमंत्री हे वॉईसरॉय असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नेरुळ मध्ये आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलतं होते. नवी मुंबईत येथील आगरी कोळी […]

मुख्यमंत्री हे वॉईसरॉय ऑफ महाराष्ट्र – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वॉईसरॉय ॲाफ महाराष्ट्र आहेत. वॉईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचेही ऐकायचा नाही तसे मुख्यमंत्री हे वॉईसरॉय असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नेरुळ मध्ये आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलतं होते.

नवी मुंबईत येथील आगरी कोळी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टिपून टिपून मारताहेत. मुख्यमंत्र्यांना असे वाटते की संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतके वर्ष राजकारण पण त्यांच्या बारामतीत असं कधीच झालं नाही, तर त्यांना साथ दिली नाही तर कुणाचं हॉटेल तोडून टाकलं, कुणाचं घर तोडून टाकलं. अशी टीका राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

सरकार म्हणजे कहर आहे. ज्या पद्धतीने सरकार वागतं आहे. ती पद्धत खरंच कौतुकास्पद आहे. हम करो से कायदा ठीक आहे. थोडे दिवस हुकूमशाहीही लोक सहन करतील. हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही. लोकशाहीवर आता कोणचाही विश्वासच नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याचा विषय काढत आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते. कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काही अंदाज नाही. गुन्हा कोणताही असू शकतो तोही सांगता येणार नाही. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाले असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number