अजित पवार यांची वैचारिक उंची कळली- नितेश राणे

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच वाद झालायचं पाहायला मिळालं. या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. संभाजी महाराज हे स्वराज्यक्षक आहेत, या वक्तव्याव मी अजूनही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही […]

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली- नितेश राणे

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच वाद झालायचं पाहायला मिळालं. या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. संभाजी महाराज हे स्वराज्यक्षक आहेत, या वक्तव्याव मी अजूनही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार नितेश राणे हे सतत अजित पवार यांच्यावर टीका करत होते. यावेळी अजित पवार यांना आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा अजित पवार यांनी “त्या टिल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझ्या पक्षाचे बाकीचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. मी असल्यांच्या नादी लागत नसतो. अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांची खिल्ली उडवली. या बाबत अजित पवार यांच्यावर नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली आणि हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number