शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत येऊन वर्षही होत नाही तोपर्यंतच शिंदे गटात राजकीय महत्वकांक्षीपोटी दोन नेत्यांमध्ये लढाया सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याच गटातील एक नेता विरोधकांना पुरावे देत असल्याचा उल्लेख केला होता.मात्र अब्दुल सत्तार हा नेता कोण आहे हे सांगत जरी नसले तरी राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांचा अंगुली निर्देश हा संजय शिरसाट यांच्याकडे आहे. त्यामुळे आता शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु झाला आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारात नेमका वाद काय ?
सरकार येताच आपण मंत्री असल्याचं संजय शिरसाठांनी घोषित केलं एवढंच नाही तर आपण पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मंत्रीपदाच्या यादीत असलेलं नाव सत्तारांमुळे त्यांचा नाव वगळलं असल्याचं शिरसाठांचं मत आहे. मंत्रिपद जावं आणि त्यासाठी आपलाच नेता कट करत असल्याचे तर त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये मंत्रीपदासाठी धूसफूस सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एकनाथ शिंदेला यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.