समृद्धी महामार्ग कामगार आर्थिक संकटात पाच महिन्यांपासून वेतन थकबाकी

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डी ते नागपूरपर्यंत नुकताच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. या महामार्गमुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास अत्यंत सोयीस्कर झाला असून अंतर ही कमी झाले असून प्रवासाचा वेळही वाचत आहे. […]

समृद्धी महामार्ग कामगार आर्थिक संकटात पाच महिन्यांपासून वेतन थकबाकी

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डी ते नागपूरपर्यंत नुकताच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. या महामार्गमुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास अत्यंत सोयीस्कर झाला असून अंतर ही कमी झाले असून प्रवासाचा वेळही वाचत आहे.

मात्र समृद्धी महामार्गावरचा रस्ता तयार करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून मध्यप्रदेशातील 300 पेक्षा अधिक मजुरांना अद्यापही वेतन मिळाले नसल्याने या कामगारांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. गेल्या पाच महिन्या पासून वेतन मिळाले नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. पाच महिन्यांपासून पगार न झाल्याचे सांगात आम्ही जगायचं कसं असा सवाल कामगारांकडून कंपनीला विचारला जात आहे.

या कंपनी मार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करीत होते. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून रात्रंदिवस काम करूनही वेतन न मिळाल्यामुळे कामगारांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी 15 किमी पायी जाऊन प्रयत्न केला. मात्र हा मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडविला व कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा केली आणि त्यांनी या चर्चेतून पुढील आठवड्यात तुमच्या खात्यात तुमचे वेतन जमा केले जाईल असे आश्वासन कंपनी मार्फत कामगारांना देण्यात आले.  तरीही मजुरानी आंदोलन कायम ठेवले असून जोपर्यंत आमच्या मजुरीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरु ठेवणार अशी भूमिका मजुरांनी घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number