‘संजय राऊतांनी गप्प बसावं’

एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे . राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्याच येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊन […]

‘संजय राऊतांनी गप्प बसावं’

एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे . राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्याच येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केला होता. दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मी दोन्ही नेत्यांची भेट घेतल्यानंतर मला जे जाणवलं ते मी ट्विटमध्ये मांडलं. प्रत्येकाच्या मनात मान-अपमान आहे. दुरावा दुर व्हावा, तुटलेल घर एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे मोठे आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी. कारण, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. बाळासाहेबांची सेना एकत्र असावी, सेनेत दोन गट नकोत असं स्पष्ट मत सय्यद यांनी व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांच्याकडे आम्ही वडीलधारे म्हणूनच पाहतो. त्यांनी सर्वांना सांगितलं की मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. ते हाक मारत आहेत. साहेबांनी बोलावलं आहे. त्यामुळे बंडखोरांनी यावं. शिंदे गटाकडून कोणी बोलत नाही. कुठे तरी काही गोष्टी अडत आहेत. त्या तोडण्याचा माझा प्रयत्न दिसेल, असं त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number