आरोग्य केंद्र बंद असल्याने बालकाचा मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने दीड महिन्याच्या बालकाचा मृत्यु झाला आहे. आमगाव तालुक्यातील कलीमाटी येथील घटना ही आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यद्वाराला रात्रीच्या वेळेस कुलुप असल्यामुळे उपचाराच्या अभावी एका दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबधित अधिकारी कर्मंचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी कुटूंबिय आणि […]

आरोग्य केंद्र बंद असल्याने बालकाचा मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने दीड महिन्याच्या बालकाचा मृत्यु झाला आहे. आमगाव तालुक्यातील कलीमाटी येथील घटना ही आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यद्वाराला रात्रीच्या वेळेस कुलुप असल्यामुळे उपचाराच्या अभावी एका दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबधित अधिकारी कर्मंचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी कुटूंबिय आणि गावकऱ्यांनी केली आहे.

रात्री १२च्या सुमारास कायरव विकास नांदणे यांच्या दीड महिन्याच्या मुलाची प्रकृती बरी नसल्याने कुटूंबियांनी कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. मात्र प्राथमिक केंद्राच्या मुख्य गेटला कुलूप लावले होते. गेट वरून  कर्मचाऱ्यांना एक ते दीड तास पर्यंत आवाज दिला मात्र कुणीही आले नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरून बोलाविण्यात आले आणि संबंधित डॉक्टरांनाही बोलाविण्यात आले. परंतु तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका दीड महिन्यांच्या मुलाचा मृत्यु झाला आहे.

बाळाला डॉक्टरने मृत घोषित करताच त्या मातेने हंबरडा फोडला. बाळाला वाचविण्यासाठी त्या मातेने आणि कुटुंबीयांनी दीड तास धडपड केली. मात्र, उपचाराअभावीच बाळ दगावल्याने त्यांची ही सर्व धडपड व्यर्थ गेली. गावकऱ्यांना हा सर्व प्रकार कळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number