जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात वडशिंगी गावात ‘अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास’ या योजनेखाली रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. यातून वडशिंगी गावातील महात्मा फुले नगर तसेच आंबेडकर नगर येथे रस्ता करणे क्रमप्राप्त होते, मात्र महात्मा फुले नगर आणि आंबेडकर नगर या दलित वस्तीतील रस्ता इतर वस्तीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून वळवण्यात आला होता. त्याच बरोबर या […]

जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात वडशिंगी गावात ‘अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास’ या योजनेखाली रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. यातून वडशिंगी गावातील महात्मा फुले नगर तसेच आंबेडकर नगर येथे रस्ता करणे क्रमप्राप्त होते, मात्र महात्मा फुले नगर आणि आंबेडकर नगर या दलित वस्तीतील रस्ता इतर वस्तीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून वळवण्यात आला होता. त्याच बरोबर या ठिकाणी बनावट पद्धतीने टेस्टिंग रिपोर्टही तयार करण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार जय महाराष्ट्रने उजेडात आणला आहे. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. सोमवारी जळगाव जामोद चे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी आपल्या टीमसह वडशिंगी या गावाला भेट दिली आहे.

याआधीच गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जनार्दन राऊत तसेच वडशिंगी ग्रामपंचायतचे सचिव गोपाल गिर्हे यांना सक्त ताकीद दिली असून त्यांच्या सर्विस बुक मध्ये संबंधित केलेल्या चुकीबद्दल नोंद करण्यात आलेली आहे. आता गट विकास अधिकारी यांनी गावात स्वतः जाऊन चौकशी केली आहे. कशा पद्धतीने या गावातून दलितांचा निधी वळवण्याचा प्रयत्न झाला? त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाला कोण कोण दोषी आहेत? याबाबत लवकरच ते खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.

त्यामुळे जय महाराष्ट्रच्या बातमीचा मोठा दणका हा म्हणावा लागेल. गावातील दलितांसाठी आलेला निधी इतरत्र वळवून एका प्रकारे ॲट्रॉसिटी करण्याचा हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल.. याबाबत लवकरच पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्रला प्राप्त झाली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जय महाराष्ट्रने हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आणून पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्राचा जातीयवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number