केतकीच्या जामीन अर्जावर २६ तारखेला सुनावणी

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सामजमाध्यमांवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यासंदर्भात केतकीने ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर येत्या २६ मे ला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने केतकीला कळव्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, मात्र केतकीने ठाणे न्यायालयात […]

केतकीच्या जामीन अर्जावर २६ तारखेला सुनावणी

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सामजमाध्यमांवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यासंदर्भात केतकीने ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर येत्या २६ मे ला सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने केतकीला कळव्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, मात्र केतकीने ठाणे न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी रोखुन ठेवली आहे, तर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अट्रोसिटी गुन्ह्यात केतकीला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन केतकी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.

केतकीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आले असल्याचे केतकीचे वकिल घनश्याम उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे. तसेच पोलीस निपक्ष रित्या काम करत नाहीत, सत्तेत असलेल्या लोकांना मदत करत असल्याचा आरोप देखील केतकीच्या वकिलांनी केले आहेत. उद्या रबाळे पोलिसांची पोलीस कोठडी संपत असुन उद्या केतकीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर केतकीने ठाणे न्यायालयात जामीनासाठी केलेल्या अर्जावर २६ मे ला सुनवाई होण्याची शक्यता असल्याने आता येत्या काळात केतकी ची सुटका होतेय कि तिच्या अडचणीत वाढ होतेय हे पाहणं गरजेचं राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number