राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेला काही लोकांनी विरोध केला आहे. मशिदीवरीन भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका घेतली होती. त्याच भूमिकेवर राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आल्याची माहीती समोर आली आहे. या धमकी संदर्भात बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला त्या संवाधात नांदगावकर म्हणाले ती मला आणि राज ठकरेंना जीवे मारण्याचं पत्र आलं आहे. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल अशी संतप्त प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. आणि बाळा नांदगावकर बोलताना असेही म्हणाले की मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यामुळे आता मनसे पुढे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.