मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी कॉंग्रेसची बैठक

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राज्यात काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. तसेच विधानसभा अध्यक्ष […]

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी कॉंग्रेसची बैठक

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राज्यात काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होत आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

काँग्रेसच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व आरोग्य कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन  राऊत उपस्थित होते.

मुंबई दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच देशात काँग्रेस पक्षाला वगळून आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. आणि यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच येत्या अधिवेशनात काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number