केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’मधून उड्डाण

हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी सकाळी बंगळुरू येथील हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. स्वदेशी तेजस लढाऊ विमानात बसणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. राजनाथ सिंग यांनी अर्धा तास विमानात  होते. हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे. तेजस विमानाची वैशिष्ट्ये तेजस […]

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस’मधून उड्डाण

हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी सकाळी बंगळुरू येथील हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावरून हिंदुस्थानी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. स्वदेशी तेजस लढाऊ विमानात बसणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. राजनाथ सिंग यांनी अर्धा तास विमानात  होते. हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे.

तेजस विमानाची वैशिष्ट्ये

तेजस हे भारतीय बनावटीचं लढाऊ विमान आहे. एचएएलनं तेजस विमानाची निर्मिती केलीये. तेजस विमान हे वजनानं अतिशय हलकं आहे, कारण त्याचा सांगाडा हा कार्बन फायबरनं बनवण्यात आलाय. पण हलकं असूनही इतर विमानांच्या तुलनेत मजबूत आहे.

तेजसचं वजन 6,560 किलो आहे. त्यामुळं ते 50 हजार फुटांपर्यंत भरारी घेऊ शकतं. त्याचे पंख 8.2 मीटर आहेत, त्याची लांबी 13.2 मीटर तर 4.4 मीटर ऊंच आहे. तज्ज्ञांच्या मते, तेजस हे पाकस्तान आणि चीननं बनवलेल्या लढाऊ विमान – जेएफ – 17 थंडर च्या तोडीचं बनवण्यात आलंय. तेजस हे एका वेळी 2300 किमी पर्यंत प्रवास करु शकतं, तर थंडर 2307 किमी प्रवास करु शकतं.

तेजस अर्धा किमी पेक्षा कमी जागेत उड्डाण करु शकतं. तेजसनं 2500 तासांत 3000 पेक्षा जास्त वेळा उड्डाण केलंय. तेजस हे मेंटेनन्सच्या बाबतीतही सुखोई -३० पेक्षा कमी खर्चीक आहे.
भारतीय बनावटीचं असलं तरीही त्याचं इंजीन अमेरीकन आहे, रडार आणि वेपन सिस्टीम इस्त्राइलचं तर इजेक्शन सीट ब्रिटनचं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number