YOU TUBE च्या माध्यमातून घरफोडी कशी करायची हे शिकून दोन युवकांनी एका बंद घरात चोरी केली त्यात ते यशस्वी झाले मात्र तोच प्रकार दुसऱ्यांदा करण्याचा प्रयत्न फसला आणि या दोघांना अटक करण्यात आलं आहे. त्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे दोघेही आरोपी 18 ते 19 वयाचे असून ही चोरीची कल्पना त्यांना यूट्यूबचे व्हिडीओ बघून आली आहे. घरफोडी कशी करायची हे व्हिडीओ युट्यूबवर बघून त्यांनी ही चोरी केली आहे. पोलीसांनी सापळा रचत या दोघांना अटक केलं आहे. या दोघांपैकी एक Zomato टीशर्ट घालून गिट्टीखदान परिसरात फिरला त्याने बंद घर शोधलं आणि मग दुसऱ्याला बोलावलं आणि बंद असलेल्या घरात दोघांनी चोरी केली काही सोन्याचे दागिने काही बेन्टेक्सचे आणि इतर सामान घेऊन रफूचक्कर झाले.
मात्र दुसऱ्या दिवशी याच परिसरातील वेगळ्या भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांना हे दोन युवक रात्रीच्या वेळी मोटर सायकल वरून जात असल्याचं दिसलं आणि त्यांनी याना थांबण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले नाही. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी सापळा रचत त्यांना पकडलं त्यांच्या जवळच्या बॅगची तपासणी केली असता सगळं चोरीच साहित्य त्यांच्या बॅग मध्ये मिळाल्याने पोलिसांनी याना बेड्या ठोकल्या .