प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेदरम्यान संगमनेरच्या सभेतील स्टेजवर जाऊऩ मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने महाराज भाजपामध्ये प्रवेश करतात की काय आणि बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युतीकडून इंदोरीकर महाराज निवडणुक लढवणार अशा अनेक चर्चेंना उधान आले होते. मात्र आज महाराज यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या भेटीचे स्पष्टीकरण सोशल मिडीयावर दिल्याने या सगळ्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाल्याचं पहायला मिळालं आहे.
सोशल मिडियावर महाराज यांच्या अनेक पोस्ट कालपासून वायरल होत होत्या की महाराज संगमनेर विधानसभा मतदार संघातुन बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार मात्र आज इंदोरीकर महाराज यांनी सोशल मीडियावर आपली एक पोस्ट व्हायरल केली आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेलो असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत तसेच मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाचा मफलर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो.
जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही आणि संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे.
समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून चिरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देतो अशी पोष्ट स्वत: ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सोशल मिडियावर व्हायरल केली असल्याने सर्वच राजकीय चर्चांना आता स्वल्पविराम मिळाला आहेत.