खासदार उदयनराजे भाजपाप्रवेशावर ठाम; अमोल कोल्हेंचा प्रयत्न निष्फळ

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पक्षप्रवेश होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणं काही थांबत नाहीये. खासदार उदयनराजे भोसले यांचाही भाजपाप्रवेश लवकरचं होईल. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यात ते अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे. चर्चा निष्फळ! खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले असुन खासदार […]

खासदार उदयनराजे भाजपाप्रवेशावर ठाम; अमोल कोल्हेंचा प्रयत्न निष्फळ

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पक्षप्रवेश होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणं काही थांबत नाहीये. खासदार उदयनराजे भोसले यांचाही भाजपाप्रवेश लवकरचं होईल. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यात ते अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे.

चर्चा निष्फळ!

खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले असुन खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बराच वेळ त्यांची चर्चा सुद्धा झाली. परंतु ही मनधरणीची चर्चा निष्फळ झाल्याचं समजले आहे. अमोल कोल्हे यांनी प्रयत्न करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

या चर्चेनंतर माध्यमांसोबत बोलताना उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत मी अडचणीत असताना कोणीही माझ्या मदतीला पक्षातील नेता आलं नाही अशी टिका उदयनराजेंनी केली आहे. तसेच कोणत्या पक्षात जायचं हे मी ठरवेन असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

मोदींच्या उपस्थितीत उदयनराजेंना प्रवेश हवाय या चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर उदयनराजेंनी खरपुस समाचार घेतला मला कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला तर मी खो घालेन असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

गणेश मिरणुकीत डा‌ॅल्बी पाहीजेचं तरुणांचा उत्साह ठवायचा असेल तर डा‌ॅल्बी हवीच असं म्हणत डाॅल्बी मुळे इमारती पडत असत्या तर सर्जिकल स्ट्राईकला विमान न वापरता डा‌‌ॅल्बीच वापरली असती असं गमतीशीर विधानसुद्धा उदयनराजे भोसलेंनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number