अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण आज तांत्रिकदृष्ट्या भरलंय. 11,060 दशलक्ष घन फुट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा साठा आज दुपारी 1 वाजता पाणीसाठा 10,500 दलघफू झाल्याने धरणातून सध्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, अंब्रेला फॉलद्वारे 300 क्यूसेक तसंच स्पिलवेद्वारे 2400 क्यूसेक असं एकूण 3500 क्यूसेकने धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे.
मागच्या वर्षी 9 ऑगस्ट ला धरण भरले होते या वर्षी पाऊस उशीरा होऊनही धरण 3 ऑगस्टलाच भरले आहे.
अवघ्या दोन महिन्यात हे धरण भरलं असून 15 ऑगस्टपूर्वी धरण भरण्याची रेकॉर्ड या वेळीही राहिला आहे.
भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही.
सध्या निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4500 दलघफू आहे.
निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. आणि हे पाणी जायकवाडी धरणाकडे आपला प्रवास सुरु करेल.