दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होणार

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा मार्च २०२४ रोजी पार पडल्या. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर शिक्षक आणि पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाबाबतची असलेली उत्सुक आता संपुष्टात आहे. दहावी आणि बारावीचा निकाल म्हटलं की पालकांना,शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्याची आतुरता असते. त्यामुळे त्यांची उत्सुकता आता संपणार आहे.  सोमवारी दुपारी एक वाजता mahresult.nic या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन त्यांचा निकाल पाहता येणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number