मुसळधारमुळे १०० गावांचा संपर्क तुटला

  मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. तर या गावातील बाजारपेठ व निवासी घरे पाण्याखाली बुडाली आहेत. परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून त्यातून २१२६ क्युसेक […]

मुसळधारमुळे १०० गावांचा संपर्क तुटला

 

मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. तर या गावातील बाजारपेठ व निवासी घरे पाण्याखाली बुडाली आहेत. परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून त्यातून २१२६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात तीन दिवसापासून संततधार पाऊस येत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यातच भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली-भामरागड महामार्गावर छोट्या मोठ्या पुलांचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने नदी नाल्यांच्या काठावरील गावांना धोका निर्माण उदभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाण्याचा जोर कायम असल्याने काही शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे.

पुरामुळे अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून १०० पेक्षा अधिक गावांच्या तुटलेल्या सम्पर्कामुळे नागरिकांच्या प्रवासाची गैरसोय होत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number