जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे गुण आता बंद होणार आहेत.
भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला.
यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे.
हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे. नववी आणि दहावी या दोन इयत्तांसाठी सध्या भाषा आणि द्वितीय भाषा विषयांसाठी तोंडी परीक्षा
घेतल्या जातात.