नाशिकच्या सिडको परिसरात १० ते १५ गाड्यांची तोडफोड

नाशिकच्या सिडको परिसरात १० ते १५ गाड्यांची तोडफोड नाशिकमधील सिडको परिसरात गावगुंडांकडून १० ते १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरामध्ये याआधीही अश्या प्रकारच्या घटना घडल्यामुळे परिसरात पोलिसांचा वचक राहिलेला नाही असं परिसरातील नागरिक म्हणत आहेत. या आधीही नाशिकच्या सिडको परिसरात कोयत्याने वार करून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या, परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि नागरिकांच्या मनामध्ये […]

नाशिकच्या सिडको परिसरात १० ते १५ गाड्यांची तोडफोड

नाशिकच्या सिडको परिसरात १० ते १५ गाड्यांची तोडफोड

नाशिकमधील सिडको परिसरात गावगुंडांकडून १० ते १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरामध्ये याआधीही अश्या प्रकारच्या घटना घडल्यामुळे परिसरात पोलिसांचा वचक राहिलेला नाही असं परिसरातील नागरिक म्हणत आहेत. या आधीही नाशिकच्या सिडको परिसरात कोयत्याने वार करून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या, परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हे प्रकार घडवले जात असल्याचं नागरिक सांगत आहेत. पोलिसात तक्रार दिली तर पुन्हा असाच काही प्रकार घडेल या भीतीने नागरिकांनी पोलिसात तक्रारही दाखल केली नव्हती,

यावेळी देखील सिडको परिसरातील चारचाकी गाड्यांच्या काचा अज्ञातांकडून फोडण्यात आल्या आहे. परिसरात दहशत निर्माण करणे आणि पोलिसांचा वचक घालवणे ह्या उद्देशाने तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गाड्यांची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत, आणि लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांच्या अटकेत २ संशयित असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दहशत माजवण्याचा प्रयत्नात हा प्रकार केला असल्याचं पोलिसांना संशयितांकडून सांगण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणा विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number