नोटाबंदीच्या जाचातून सुटका होते न होते तोच आता नागरिकांपुढे 10 रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न उभा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नोटाबंदीच्या जाचातून सुटका होते न होते तोच आता नागरिकांपुढे 10 रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न उभा राहिला आहे.   आरबीआयच्या निर्देशांनंतरही बँका 10 रुपयांची नाणी जमा करण्यास नकार देत असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून, पुन्हा एकदा 10 रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवेने जोर धरला आहे.   पंढरपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या […]

नोटाबंदीच्या जाचातून सुटका होते न होते तोच आता नागरिकांपुढे 10 रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न उभा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नोटाबंदीच्या जाचातून सुटका होते न होते तोच आता नागरिकांपुढे 10 रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न उभा राहिला आहे.

 

आरबीआयच्या निर्देशांनंतरही बँका 10 रुपयांची नाणी जमा करण्यास नकार देत असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून, पुन्हा एकदा 10 रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवेने जोर धरला आहे.

 

पंढरपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये एक ग्राहक 10 रुपयांची नाण्याची रक्कम आपल्या खात्यात जमा करण्यास गेला असता. त्याला बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा सामना करावा लागला. तसेच  10 रुपयांची नाणी बँकेत जमा करता येत नसल्याचा साक्षात्कारसुद्धा झाला.

 

बँक अधिकाऱ्यांच्या या उर्मट उत्तराने हैराण झालेल्या ग्राहकाने जेव्हा ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरूवात केली.

 

तेव्हा तर एका अधिकाऱ्याने अकलेचे तारे तोडत. घागरीतलं पाणी नळात जात नसल्याचा तर्क मांडत 10 रुपयांची नाणी घेण्यास सपशेल नकार दिला.

 

त्यामुळे या घटनेने हादरलेल्या ग्राहकांनी आता या 10 रुपयांच्या नाण्याचं करायचं काय हा प्रश्न सध्या त्यांना सतावतो.

 

एकीकडे आरबीआय ग्राहकांना सर्व सोयी सुविधा विना अडथळा मिळाव्यात याकरता नियमावली तयार करते. तर, दुसरीकडे मात्र त्यांच्याशी संलग्न बँकांच आरबीआयच्या नियमावलीला हरताळ फासत असल्याचं चित्र दिसत असल्याने ग्राहकांची स्थिती म्हणजे ‘जायें तो जायें कहां’ अशी झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number