राज्यात शेतकरी पुन्हा संपावर जाणार…

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून 10 दिवस संप पुकारला आहे. संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह 50 टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झालेली नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.  या संपादरम्यान 1 […]

राज्यात शेतकरी पुन्हा संपावर जाणार…

जय महाराष्ट्र न्यूज,मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून 10 दिवस संप पुकारला आहे. संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह 50 टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झालेली नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 

या संपादरम्यान 1 जूनपासून भाजीपाला, दूधासारख्या वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व  मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन शांतेच्या मार्गाने पार पाडले जाणार असून शेतकरीच या आंदोलनाचा नेता असणारं आहे.

या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. आता या संपानंतर तरी सरकार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना मान्यता देणार का ? हे पाहणंही तितकचं महत्वाचं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number