Mohanthal Recipe: खास पाहुण्यांसाठी परफेक्ट स्वीट डिश ‘मोहनथाळ’

मोहनथाळ हा महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ किंवा खास पाहुणचारासाठी हा पदार्थ आवर्जून तयार केला जातो.

Mohanthal Recipe: खास पाहुण्यांसाठी परफेक्ट स्वीट डिश ‘मोहनथाळ’

Mohanthal Recipe: मोहनथाळ हा महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ किंवा खास पाहुणचारासाठी हा पदार्थ आवर्जून तयार केला जातो. योग्य पद्धतीने भाजलेले बेसन आणि अचूक साखरेचा पाक यामुळे त्याची चव अधिक खुलते. वरून घातलेले बदाम, काजू आणि पिस्ता त्याला आकर्षक रूप देतात. घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार होणारा मोहनथाळ हा प्रत्येकाच्या आवडीचा गोड पदार्थ आहे. जाणून घ्या मोहनथाळ बनवण्याची रेसिपी…

साहित्य:

  • बेसन- १ वाटी
  • साखर- १ वाटी
  • ड्रायफ्रुट्स- १ टेस्पून (बदाम, काजू, पिस्ता)
  • दूध- ½ वाटी
  • तूप- आवश्यकतेनुसार 

हेही वाचा: Chicken Popti Recipe: गावरान चिकन पोपटी बनवण्याची सोपी रेसिपी

कृती:

मोहनथाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन चाळून घ्यावे, जेणेकरून त्यातील गुठळ्या निघून जातील. त्यानंतर त्यामध्ये तूप आणि थोडेसे दूध घालून मिश्रण छान एकजीव करून घ्या. हे मिश्रण थोडावेळ झाकून ठेवा.
यानंतर कढईत तूप गरम करून त्यामध्ये तयार केलेले बेसनाचे मिश्रण मंद आचेवर परतावा. बेसन छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत ते परतणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. तयार झालेला पाक हळूहळू बेसनाच्या मिश्रणात घालून सतत हलवत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
मिश्रण घट्ट होत आले की एका ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रण पसरवून घ्या. वरून बदाम, काजू, पिस्ता यांसारखे ड्रायफ्रुट्स टाका. थोडे थंड झाल्यावर सुरीने त्याच्या वड्या कापा. अशा प्रकारे सुगंधी आणि चविष्ट मोहनथाळ तयार होतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number