यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह 107 जण कोरोनामुक्त…

यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 107 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील […]

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह 107 जण कोरोनामुक्त…

यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 107 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 87 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 210 जणांमध्ये 129 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 114 रुग्ण, पुसद येथील 41, पांढरकवडा 33, दारव्हा 17, वणी 3, राळेगाव 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.
सोमवारी एकूण 1113 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 903 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1052 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16255 झाली आहे. 24 तासात 107 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14755 आहे. तर जिल्ह्यात एकूण 448 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 153588 नमुने पाठविले असून यापैकी 152969 प्राप्त तर 619 अप्राप्त आहेत. तसेच 136714 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number