‘इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होईल’ – अजित पवार

इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इंदू मिल स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार असून या स्मारकासाठी निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, अशा सूचना अजित पवार यांनी गुरुवारी दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आज महामानव […]

‘इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होईल’ – अजित पवार

इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इंदू मिल स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार असून या स्मारकासाठी निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, अशा सूचना अजित पवार यांनी गुरुवारी दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांनी सर्वांना लढायचे बळ दिले आहेत. देशाला एकजूट ठेवण्यात बाबासाहेबाबांच्या संविधानाचा मोठा वाटा आहे. बाबासाहेब यांचं स्मरण करण्याचा आज दिवस आहे. गरीब वंचित आणि दुर्बल घटकांसाठी ते लढले. याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. बाबासाहेबांनी सर्वोत्तम आणि सर्वोच्च संविधान देशाला दिले आहे, असे ते म्हणाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले आहे. तसेच आंबेडकरांच्या समाधीस्थळ चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर नेते आंबेडकरांना अभिवादन करण्यास उपस्थित होते. यावेळी आंबेडकरांच्या समाधीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुषवृष्टी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number