मलिकांनंतर आता कुणाचा नंबर?, सोमय्यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय वातावरणात शाब्दिक टोलेबाजी सुरू झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनंतर आता कुणाचा नंबर? असा सवाल सोमय्यांनी ट्विट्दवारे उपस्थित केला आहे. किरीट […]

मलिकांनंतर आता कुणाचा नंबर?, सोमय्यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय वातावरणात शाब्दिक टोलेबाजी सुरू झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनंतर आता कुणाचा नंबर? असा सवाल सोमय्यांनी ट्विट्दवारे उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले की, ‘अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब. उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व घोटाळेबाजी नेत्यांना हिशोब द्यावा लागणार आहे.’ किरीट सोमय्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. परंतु आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. राज्यात ज्या मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढू आणि महाराष्ट्राला घोटाळामुक्त करू, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिकांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. मलिकांना ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. ईडीकडून अटकेची कारवाई केल्यानंतर नवाब मलिक प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘झुकेंगे नही.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number