उद्धव यांचा राउतांना ‘दे धक्का’

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत समर्थक ज्येष्ठ शिवसैनिकावर कारवाई करत संजय राऊत यांना धक्का दिला आहे. उद्धव गटात विभागप्रमुख पदावरून संघर्ष सुरु होता. संजय राऊत विरुद्ध अरविंद सावंत यांतील वाद विकोपाला गेला. त्यामुळे, दक्षिण मुंबई उद्धव गटात मोठा फेरबदल करत संजय राऊत समर्थक पांडुरंग सकपाळ यांची विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी […]

उद्धव यांचा राउतांना ‘दे धक्का’

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत समर्थक ज्येष्ठ शिवसैनिकावर कारवाई करत संजय राऊत यांना धक्का दिला आहे.
उद्धव गटात विभागप्रमुख पदावरून संघर्ष सुरु होता. संजय राऊत विरुद्ध अरविंद सावंत यांतील वाद विकोपाला गेला. त्यामुळे, दक्षिण मुंबई उद्धव गटात मोठा फेरबदल करत संजय राऊत समर्थक पांडुरंग सकपाळ यांची विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत समर्थक संतोष शिंदे यांच्याकडे विभागप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
अद्याप, पांडुरंग सकपाळ यांना हटवण्याचे कारण उघड झालेले नाही. पांडुरंग सकपाळ या ज्येष्ठ शिवसैनिकाचे विभाग प्रमुखपद काढून घेतल्यामुळे याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर, पांडुरंग सकपाळ यांना नवीन जबाबदारी देण्यात येईल का ? नवीन जबाबदारी सोपवण्यात आली नाही तर पांडुरंग सकपाळ उद्धव गटात थांबणार का ? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number