Teeth Sensitivity: थंड पाणी पिताच दातांत झिणझिण्या येतात? दुर्लक्ष करू नका, असू शकतं ‘या’ गंभीर समस्येचं लक्षण

वेळेत दंतचिकित्सकांचा सल्ला घेतल्यास मोठ्या त्रासापासून बचाव होऊ शकतो.

Teeth Sensitivity: थंड पाणी पिताच दातांत झिणझिण्या येतात? दुर्लक्ष करू नका, असू शकतं ‘या’ गंभीर समस्येचं लक्षण

उन्हाळ्यात थंड पाणी पिणे, आईस्क्रीम खाणे किंवा थंड पेय पिणे अनेकांना खूप आवडते. मात्र काही लोकांना थंड पाणी तोंडामध्ये जाताच दातांमध्ये अचानक झिणझिण्या किंवा हलक्या वेदना जाणवतात. हा त्रास काही सेकंदच टिकतो, पण तो अस्वस्थ करणारा असतो. अनेक जण याकडे सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु दंततज्ज्ञांच्या मते, थंड पाणी पिताच दातांत झिणझिण्या येणे हे दातांशी संबंधित एका सामान्य समस्येचे लक्षण असू शकते. वेळेत याकडे लक्ष दिल्यास पुढे होणाऱ्या मोठ्या त्रासापासून बचाव होऊ शकतो.

थंड पाणी पिल्यावर दातांत झिणझिण्या येण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे दातांची संवेदनशीलता (Sensitivity). दातांचा बाहेरील संरक्षणात्मक थर म्हणजे एनॅमल. हा थर कमकुवत झाला किंवा झिजू लागला तर दात आतून अधिक संवेदनशील होतात. अशा वेळी थंड किंवा गरम पदार्थ तोंडात गेल्यावर दातांत झिणझिण्या किंवा हलकी वेदना जाणवू शकते. आजकाल ही समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे.

काही वेळा दात आणि हिरड्या कमकुवत होणे हेही यामागील कारण असू शकते. हिरड्या हळूहळू मागे सरकू लागल्या की दातांची मुळे उघडी पडू लागतात. दातांची मुळे अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे थंड पाणी, आईस्क्रीम किंवा इतर थंड पदार्थ तोंडात गेल्यावर लगेच झिणझिण्या जाणवू लागतात.

हेही वाचा: Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल

याशिवाय काही लोक दात स्वच्छ करण्यासाठी खूप जोराने ब्रश करतात. मात्र असे केल्याने दातांचा वरचा थर हळूहळू झिजू लागतो. परिणामी दात अधिक संवेदनशील होतात. अशा स्थितीत थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यावर वेदना किंवा झिणझिण्या जाणवू शकतात. तसेच दाताला कीड लागणे किंवा कॅव्हिटी तयार होणे हेही याचे एक कारण असू शकते. कॅव्हिटीमुळे दातांमध्ये लहान छिद्रे तयार होतात आणि थंड पदार्थ त्या भागापर्यंत पोहोचल्यास दातांच्या नसांमध्ये अचानक झटका बसल्यासारखे वाटते.

जर थंड पाणी पिताना वारंवार दातांत झिणझिण्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अशा वेळी दंतचिकित्सकांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते. योग्य टूथपेस्ट वापरणे, मऊ ब्रशने दात घासणे आणि नियमित तोंडाची स्वच्छता राखणे यामुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. दातांशी संबंधित लहान समस्या वेळेत ओळखून उपचार करणे हेच पुढील मोठ्या त्रासापासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग ठरतो.

आरोग्य सूचना (Health Disclaimer): या लेखातील माहिती केवळ सामान्य जनजागृती आणि माहितीपुरती आहे. येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही आरोग्य समस्या, उपचार किंवा औषधोपचार करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीचा वापर करून केलेल्या कोणत्याही निर्णयासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.

हेही वाचा: LPG Cylinder Expiry Date: सावधान! मुदत संपलेला गॅस सिलेंडर ठरू शकतो जीवघेणा; 'अशी' तपासा एक्सपायरी डेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number