Toilet Cleaning Hacks: टॉयलेटमध्ये सर्वात जास्त घाण असल्याने जंतू आणि दुर्गंधी येते. वेळोवेळी टॉयलेट स्वच्छ केले नाही तर अस्वच्छतेमुळे गंभीर आजार पसरण्याची शक्यता उद्भवते. म्हणून टॉयलेट नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. लोक बाजारातील विविध प्रकारच्या, सुगंधित क्लीनर प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु इतका खर्च करुनही काही वेळेस परिणाम चांगले मिळतातच, असे नाही. त्यामुळे काही सोप्या पद्धती वापरुनही टॉयलेट स्वच्छ करू शकता.
टॉयलेट स्वच्छ करण्याची सोपी आणि नैसर्गिक पद्धत
टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मीठ हे एक नॅचरल क्लीनर आहे. मिठामुळे टॉयलेट सीटवरील डाग स्वच्छ होतील. तसेच दुर्गंध देखील कमी होईल. मिठामध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसही मिक्स करुन टॉयलेट स्वच्छ करू शकता. बेकिंग सोड्यामुळे डाग स्वच्छ होतील आणि लिंबूमुळे टॉयलेटमधील दुर्गंध कमी होईल.
मिठाचा वापर करुन 'या' प्रकारे टॉयलेट स्वच्छ करु शकता
मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्रित करुन पेस्ट तयार करावी. टॉयलेट सीटवर ही पेस्ट टाकून ब्रशने जागा स्वच्छ करावी. रात्रभर टॉयलेटमध्ये पावडर तशीच ठेवून द्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्याने टॉयलेट सीट स्वच्छ करावी.
हानिकारक केमिकल्सच्या तुलनेत हा नैसर्गिक उपाय आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सुरक्षित असू शकतो. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)