केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बगंल्याची दोन तास पाहणी करण्यात आली. मुंबई माहपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणेंच्या आदिश बंगल्याची कसून तपासणी केली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांसोबत पोलिसही होते. तसेच बंगल्याची पाहणी होत असताना नारायण राणे हेदेखील तेथे उपस्थित होते. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या निवासस्थानासंदर्भात तपासणी अहवाल लवकरच सादर होणार आहे.
२०१७मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिष बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई पालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या बंगल्याची दोन तास कसून चौकशी केली. मात्र, आज राणेंच्या बंगल्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता राणेंच्या आदिश बंगल्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेडचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी तपासणीसाठी बंगल्यावर गेले आहेत. राणे त्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.