जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गिरच्या जंगलात सफारीचा आनंद घेतला. गिर हे आशियाई सिंहांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते आणि येथे त्यांनी सिंह-सिंहिणींच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत स्वतः छायाचित्रण करण्याचाही प्रयत्न केला.
एक्स वर पोस्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
‘आज सकाळी #WorldWildlifeDay च्या निमित्ताने मी गिरमध्ये सफारी केली. आपण सर्वजण जाणतो की गिर हे भव्य आशियाई सिंहांचे घर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील अनेक आठवणी इथे येताना ताज्या झाल्या. गेल्या अनेक वर्षांत सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः आदिवासी समुदाय आणि स्थानिक महिलांचे सिंहांच्या अधिवास संरक्षणात दिलेले योगदान प्रशंसनीय आहे.”
Yes, we cherish our wildlife That’s why we love a LION like you ? 3 lions in 1 frame ??#Gir #WorldWildlifeDay pic.twitter.com/ngscb62S2A — PallaviCT (@pallavict) March 3, 2025
मोदींनी पुढे गिरमधील काही विशेष क्षण शेअर करत सर्वांना गिर भेट देण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या छायाचित्रण कौशल्याची चुणूक दाखवत सिंह व सिंहिणींचे काही अप्रतिम फोटो टिपले.मोदींनी पुढे गिरमधील काही क्षण शेअर करत सर्वाना गिर भेट देण्यचे आवाहन केले.
Lions and lionesses in Gir! Tried my hand at some photography this morning. pic.twitter.com/TKBMKCGA7m — Narendra Modi (@narendramodi) March 3, 2025
गिर हे भारताच्या जैवविविधतेचे एक अनमोल रत्न असून, पंतप्रधानांच्या या भेटीमुळे गिर आणि त्याच्या वन्यजीव संवर्धन मोहिमेची जागतिक स्तरावर चर्चा होताना पाहायला मिळतंय.