दहावी (एसएससी) बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा होणार आहे. दहावीची परीक्षा लेखी स्वरुपात होणार असून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे.
१५ मार्च – प्रथम भाषा
१६ मार्च – द्वितीय व तृतीय भाषा
१९ मार्च – इंग्रजी
२१ मार्च – हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च – संस्कृत, उर्दू, गुजराती, इतर द्वितीय अथवा तृतीय विषय
२४ मार्च – गणित भाग १
२६ मार्च – गणित भाग २
२८ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली होती. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचे त्यांनी सांगितले होते. १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.