‘फेसबुकचा लोकशाहीत हस्तक्षेप थांबवा’ – सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून लोकशाही हॅक करण्याचा प्रयत्न होतोय, असा मुद्दा बुधवारी लोकसभेत सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. लोकशाही हॅक केल्याचा आरोप करत फेसबुकचा लोकशाहीत हस्तक्षेप थांबवा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच सोशल मीडियाची सत्तेशी संगनमत […]

‘फेसबुकचा लोकशाहीत हस्तक्षेप थांबवा’ – सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून लोकशाही हॅक करण्याचा प्रयत्न होतोय, असा मुद्दा बुधवारी लोकसभेत सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.

लोकशाही हॅक केल्याचा आरोप करत फेसबुकचा लोकशाहीत हस्तक्षेप थांबवा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच सोशल मीडियाची सत्तेशी संगनमत करून दिशाभूल करत असल्याचा दावाही सोनिया गांधी लोकसभेत केला आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, राजकारणासाठी सोशल मिडीयाचा सोयीस्कर वापर केला जात आहे. तसेच हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत ट्विटर आणि फेसबुकचा उल्लेख त्यांन केला आहे. या सोशल मीडिया सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचे समोर आले आहे. तसेच सोशल मीडियाची सत्तेशी संगनमत करून दिशाभूल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हे आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशाराही सोनिया गांधी यांनी लोकसभेत दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number