राज्यसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित

पुण्यात शुक्रवार पासून एमपीएससीची विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. १८ तासानंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर अलका टॉकीज चौकात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं आहे. आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दरम्यान, आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही अशा भावना […]

राज्यसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित

पुण्यात शुक्रवार पासून एमपीएससीची विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. १८ तासानंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर अलका टॉकीज चौकात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं आहे. आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दरम्यान, आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होतं. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे आंदोलक विद्यार्थी आज त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं यावर काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यातील अलका टॉकी चौकात विद्यार्थ्यांचे गेल्या १८ तासापासून आंदोलन सुरु होतं. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिस सातत्यानं समजवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार आहेत, त्यांना तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटण्याचा प्रयत्न करा असेही पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. मात्र, तरीही विद्यार्थ्यांनी रात्रीच्या एवढ्या थंडीत आंदोलन सुरुच ठेवले होते. जवळपास ७०० विद्यार्थी रस्त्यावर बसून होते. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहे. त्यामुळं आज यावर तोडगा निघणार का हे पाहावं लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number