एसटी संप : अवमान याचिका लागू करण्यास न्यायालयाचा नकार

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय न्यायालयात घेण्यात आलेला नाही. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान न्यायालयाने अवमान याचिका लागू करण्यास नकार दिला आहे. एसटी विलिनीकरणावर त्रिसदस्यीय समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आजही दिलासा मिळालेला नाही. […]

एसटी संप : अवमान याचिका लागू करण्यास न्यायालयाचा नकार

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय न्यायालयात घेण्यात आलेला नाही. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान न्यायालयाने अवमान याचिका लागू करण्यास नकार दिला आहे.

एसटी विलिनीकरणावर त्रिसदस्यीय समितीने आज न्यायालयात अहवाल सादर केला. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आजही दिलासा मिळालेला नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान जे एसटी कर्मचारी कामावर रुजू होण्यास इच्छूक आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल जमा करून त्यांन कामावर रुजू करून घेण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज सुनावणी झाली असून कर्मचाऱ्यांन आजही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे या दुखवट्यात सहभागी युनियन बाहेर पडल्या तरीसुद्धा कर्मचाऱ्याकंडून दुखवटा सुरूच ठेवला आहे. यावेळी संप या शब्दाला दुखवटा असे म्हटले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप नसून भारतीय संविधानानुसार दुखवटा आहे हे सिद्ध झाल्याचे कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये अनेक एसटी कर्मचाऱ्यांची मनस्थिती चांगली नसून त्यांची आरोग्य विषयक चाचणी करणे गरजेचे असून सरकारने कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number