सोनिया गांधी शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला अवघ्या काही मिनीटांचा अवधी शिल्लक राहिला आहे. उद्धव ठाकरेंसोबत महाआघाडीचे काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रापासून ते विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असणार आहेत.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. आदित्य ठाकरेंनी बुधवारी सोनिया गांधीची भेट घेऊन शपथविधीच्या […]

सोनिया गांधी शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला अवघ्या काही मिनीटांचा अवधी शिल्लक राहिला आहे. उद्धव ठाकरेंसोबत महाआघाडीचे काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रापासून ते विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित असणार आहेत. 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. आदित्य ठाकरेंनी बुधवारी सोनिया गांधीची भेट घेऊन शपथविधीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.

सोनिया गांधींनी पत्राद्वारे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महाआघाडीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच राहुल गांधींनी देखील पत्राद्वारे महाआघाडीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहु न शकल्याने दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे.   

     

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number