Ban On Social Media: 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी; ‘या’ देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय

16 वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Ban On Social Media: 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी; ‘या’ देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय

Ban On Social Media:  ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि डेन्मार्क पाठोपाठ आता स्पेननेही सोशल मीडियाबाबत एक धाडसी पाऊल उचलले आहे. स्पेनमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी केली आहे. दुबई येथे आयोजित शिखर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. उदयोन्मुख पिढीला ऑनलाइन विश्वातील घातक आणि अश्लील सामग्रीपासून वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंदी घालण्यामागचे मुख्य कारण
पंतप्रधान सांचेझ यांनी या निर्णयासाठी मोठ्या टेक कंपन्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, या कंपन्या केवळ नफा मिळवण्यासाठी बाल लैंगिक शोषण, डीपफेक प्रतिमा आणि अश्लील व्हिडिओंसारख्या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहेत. सोशल मीडियामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढत असून त्यांच्यातील नैतिक, सामाजिक आणि वर्तणुकीय मूल्यांचा ऱ्हास होत आहे. मुलांच्या निकोप विकासासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा – Data Tracking : सावधान! फेसबुक-इन्स्टाग्राम ठेवतं तुमच्यावर पाळत? ऑनलाईन डेटा चोरी रोखण्यासाठी 'ही' सेटिंग आताच बदला

राजकीय पाठबळ आणि जागतिक स्थिती
विशेष म्हणजे, स्पेनमधील विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. जागतिक स्तरावर पाहिल्यास, ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी 16 वर्षांखालील मुलांवर अशी बंदी घातली होती. त्यानंतर डेन्मार्क (15 वर्षे) आणि जानेवारी 2026 मध्ये फ्रान्सनेही कायदा करून शाळांमध्ये ही बंदी लागू केली आहे. सध्या ब्रिटन आणि भारतातही अशा प्रकारच्या बंदीची मागणी होत असली, तरी तिथे अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number