कोकणातील राजापूर रिफायनरी प्रकल्प त्याच्या जागेमुळे चांगलाच चर्चेत आहे. कोकण वासियांचा या प्रकल्पाला विरोध असून त्यांनी या संदर्भात अनेकवेळा आपला निषेध राज्य सरकारकडे वेगवेगळ्या पद्धतीने नोंदवला आहे.
मात्र, राज्य सरकार आपल्या निर्णयाबाबत ठाम असल्याचे चित्र अद्याप तरी दिसत आहे. याप्रकरणी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘सगळेच प्रकल्प विनाशकारी नसतात’ असं म्हंटलंय. रिफायनरीच्या बाबतीत केंद्र करकार अनुकूल आहे, तसेच सरकार आणि स्थानिक जनतेत समन्वय असायला हवा , असंही ते म्हणाले आहेत. लोकांना रोजगार मिळावे हा केंद्र सरकारचा उद्देश आहे असं नाईक म्हणाले आहेत. तर, या रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीतली कोणाची राजकीय भूमिका आहे का, हे लोकांनी पडताळून पाहणं गरजेचं आहे , अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.
दरम्यान , आता कोकणातील या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भविष्य काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.