कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आणि काँग्रेस या मावितातल्या दोन्ही राजकीय पक्षांनी दावा केला. मात्र, माविआत पडती भूमिका घेत शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचे ठरवल्याचे समजत आहे.
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घोषित झाली आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपासोबत युतीत निवडणूक लढताना शिवसेनेने गमावली असल्याने आता माविआ अंतर्गत शिवसेनेसाठी जागा सोडावी असा आग्रह केला गेला होता.
काँग्रेस मात्र हा आग्रह फारसा गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे. स्थानिक शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांना स्वतःसाठी उमेदवारी हवी असताना काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावाचा विचार सुरु केल्याचे समजत आहे. त्यातच शिवसेना पक्षनेतृत्वाचा कल जागा काँग्रेसला सोडण्याकडे असल्याने राजेश क्षीरसागर यांचा पत्ता कट झाल्याचे समजत आहे.