राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर आहेत. १४ एप्रिल (गुरुवार) रोजी ते जळगाव दौऱ्यावर गेले असून जळगावात त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली होती. पवारांच्या स्वागतासाठी जळगावकरांनी ३० फूट उंचीचा हार बनवला आहे. पवारांच्या स्वागतासाठी जळगाव राष्ट्रवादी महानगरतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. तर या हारासाठी ४ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. जवळपास तीन दिवस हा भलामोठा हार बनवण्यासाठी लागले असल्याचं म्हंटलं जातंय.
शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या अमरावती दौऱ्यानंतर आता ते जळगाव दौऱ्यावर गेले आहेत. पवारांचे जळगावकरांनी भलामोठ्ठा हार बनवून जल्लोषात स्वागत केले. जळगावातील काही महत्वाच्या कार्यक्रमांसोबत पवारांच्या जामनेर, भुसावळ आणि अमळनेर येथे जाहीर सभा होणार आहेत. तसेच त्यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे आणि इतर नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, कायमच चर्चेत असलेले शरद पवार यांच्या स्वागतासाठी जळगावकरांनी केलेल्या ३० फुट उंच हाराची आता चांगलीच चर्चा होत आहे.