पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील निर्णय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता पुण्यातील शाळा देखील ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये […]

पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील निर्णय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता पुण्यातील शाळा देखील ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत. मात्र या कालावधीमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन सुरू राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number