मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात मनसेची उत्तरसभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यात सभेनंतर अकलेचे तारे तोडणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात सभेचे आयोज केले. या सभेत राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेचे ताशेरे ओढले. त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!’
दिवा विझताना मोठा होतो!
हे आज पुन्हा दिसले!
जय महाराष्ट्र!! — Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2022
ठाण्यात पार पडलेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या शिवराळपणावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणजे लवंडे असे म्हणत, लवंडे म्हणजे धरसोड भूमिका घेणारी व्यक्ती असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टिकेला संजय राऊतांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ईदनिमित्त राज ठाकरे यांनी मविआला सूचना दिल्या आहेत. मशिदीवरील भोंगे ईदपूर्वी खाली उतरवा. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाहीत. भोंगे खाली उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणारच, असे राज ठाकरे म्हणाले.