रशियाकडून युध्दविरामाचे उल्लंघन; युक्रेनचा आरोप

रशिया-युक्रेन युद्धात रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, युक्रेनही रशिया चोख प्रत्युत्तर देत आहे. तर युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी रशियाकडून काही तासांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात येते. मात्र, रशियाकडून वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात येते मात्र, त्यानंतर वारंवार रशिया युद्धविरामाचे उल्लंघन करते. त्यामुळे युक्रेन […]

रशियाकडून युध्दविरामाचे उल्लंघन; युक्रेनचा आरोप

रशिया-युक्रेन युद्धात रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, युक्रेनही रशिया चोख प्रत्युत्तर देत आहे. तर युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी रशियाकडून काही तासांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात येते. मात्र, रशियाकडून वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.

रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात येते मात्र, त्यानंतर वारंवार रशिया युद्धविरामाचे उल्लंघन करते. त्यामुळे युक्रेन नागरिकांना शहर सोडणे कठीण होत असल्याचा आरोप युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विट करत केला आहे. तसेच या हल्लादरम्यान डिहायड्रेशनमुळे एका मलाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच त्यांनी ट्विट म्हटले की, रशियाचे लष्करी सैन्य युक्रेनमधील झोपोरीझियापासून मारियुपोलपर्यंत मानवतावादी कॉरिडॉरव गोळीबार करत आहे. झापोरीझियामध्ये असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी वाहतुक सुविधा उपलब्ध आहे. मात्र रशियाकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्यांना बाहरे काढणे अशक्य होत आहे. रशियाकडून नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे ते पाळण्यासाठी रशियावर दबाव वाढवायला हवा, असेही कुलेबा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

युक्रेनचा अणुप्रकल्प रशियाच्या ताब्यात

रशियाने युक्रेनचा झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला असल्याचे रशियाच्या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. तसेच हा प्रकल्प पूर्णपणे रशियाच्या ताब्यात असून येथील काम व्यवस्तित सुरू असल्याचेही रशियाने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number