रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाच्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. मात्र, सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे कच्च्या तेलाची आयात थांबण्याची शक्यता असल्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये […]

रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूलाच्या कच्च्या तेलाची आयात केली जाते. मात्र, सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे कच्च्या तेलाची आयात थांबण्याची शक्यता असल्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम खाद्य तेलाच्या आयातीवर होणार आहे. युद्धामुळे युक्रेनमधील आयात बंद होणार असल्यामुळे खाद्यतेलाच्या सूर्यफूलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. मागील दिवसांत २००० रुपयांना मिळणारे सूर्यफूलाचे तेल आता २३०० रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध न थांबल्यास सूर्यफूल तेलाच्या किंमतींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता खाद्यतेल व्यापारी करत आहेत.

स्टील उत्पादन दरात वाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील स्टील उत्पादन दरात मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले. रशिया-युक्रेन युद्धामुळे चार दिवसांपूर्वी ५५ हजार रुपये प्रति टन असलेले स्टील आता ६९ हजार ते ७० हजार प्रतिटनवर पोहचले आहे. रशिया-युक्रेन युद्धामळे स्टीलच्या दरात वाढ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number